केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतात.

ही रक्कम २ हजार रुपयांच्या ३ हप्तांमध्ये देण्यात येते.

लवकरच या योजनेचा पुढील हप्ता जारी होणार आहे. या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत लाभार्थ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

पीएम किसान योजनेच्या १२ व्या हप्त्याची रक्कम सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जारी केली जाईल.

सामान्यतः, पहिला कालावधी एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च पर्यंत असतो.

सरकारने ३२ मे २०२२ रोजी पीएम किसानचा ११ वा हप्ता जारी केला.

सरकार दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी करते आणि सूत्रांच्या माहितीनुसार पुढील हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान, जारी करण्यात येणार आहे.

More Stories